तुळजापूर (प्रतिनिधी)- दि. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त व रक्षाबंधनदिना निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 41 रक्तदात्यांनी रक्तदान करून क्रांतिकारकांना अभिवादन केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक अमर हंगरगेकर ,सचिन घोडके, शहाजी जगदाळे, जगदिश पलंगे,रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संतोष लोखंडे, सचिव राहुल तागड माजी अध्यक्ष प्रशांत अपराध, भरत जाधव, निवेदक संजय मैंदर्गे यांच्या हस्ते करण्यात आले सिने कलावंत शंतनु गंगणे यांनी रक्तदान करून रक्तदानाचा शुभारंभ केला. यावेळी युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे, सतीश हुंडेकरी उपस्थित होते. शिबिराचा समारोप गणेश शेळके, डॉ.दिग्विजय कुतवळ, बबन गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.