धाराशिव (प्रतिनिधी)- माजी सरपंचाने पदाचा दुरूपयोग करून गावठाण जमीन हडप करत मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता अडवल्याचा आरोप करत कनगरा ग्रामस्थांनी बुधवार दि. 13 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. माजी संरपंचांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन नगर भूमापन अधिकारी तथा चौकशी अधिकाऱ्यांच्या चुकीची व खोटी मोटी दलित वस्ती लगत असलेली गावठाणची जमीन हडप केल्याचा आरोपी उपोषणकर्त्यांनी केला आहे. कोणताही मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा नसताना माजी सरपंचाने तत्कालीन नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासकीय मालमत्ता हडप केली. त्यानंतर अनु. जातीच्या नागरिकांना धमकावून दमदाटी करून दहशत पसरवून जाण्या-येण्याचा रस्ता अडवल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी 30 जुलै रोजी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देवूनही दखल घेतली नसल्याने उपोषणास बसावे लागल्याचे उपोषणकर्ते म्हणाले. उपोषणास दयानंद वावळे, उध्दव गायकवाड यांच्यासह 63 नागरिक उपोषणास बसले आहेत. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले. मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. 

 
Top