भूम (प्रतिनिधी)- दिनांक 26/08/2025 रोजी श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम 14 वर्ष वयोगट मुलींचा संघ तालुकास्तरावर प्रथम आला. या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
खेळाडूंची नावे जरडकर आदिती, कुटे, वैष्णवी, सपकाळ आनंदी, खांडेकर क्रांती, दळवे दुर्गा सांगणे श्रेय, येडमे सान्वी, बोराडे प्रज्ञा, नाईकवाडी सायली, वेदपाठक श्रावणी, बागडे आरती व राऊत समृद्धी यांना मार्गदर्शन करणारे क्रिडा शिक्षक मिसाळ आप्पा व शिंदे जयंत यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व खेळाडूंचा सत्कार संस्थेचे सचिव तथा पर्यवेक्षक सतीश देशमुख, मुख्याध्यापक भोसले माधव, संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव मोटे यांनी विजयी खेळाडूंचा सत्कार केला व जिल्हास्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.