तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांनी सर्व मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात डीजे व तीव्र लेझर लाईट्स वापरण्यास परवानगी नाकारावी अन्यथा 29 ऑगस्ट रोजी एक दिवस उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मंदिर परिसरातील मिरवणुकांमध्ये होणारा डीजे व लेझरचा प्रचंड आवाज व प्रकाश भक्तांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले व विद्यार्थी यांना या प्रचंड आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. डीजे व लेझरच्या तीव्र आवाजामुळे कान, डोळे, नाक व शरीरावर दुष्परिणाम होत असून, भाविकांची श्रद्धा व मन:शांती भंग पावत आहे. यासाठी तात्काळ सर्व मिरवणुकांमध्ये डीजे व लेझर लाईट्सना बंदी घालून, घालण्याची मागणी निवेदन उत्तम अमृतराव, किरण खपले, श्रीकांत वाघे सह अनेकांनी निवेदन दिले.