धाराशिव (प्रतिनिधी)- भास्कर (दादा) कोंडिबा मुंडे. धाराशिव, यांचे आज सकाळी वयाच्या 81 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्याच्यावर कपिलधार स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर लोक उपस्थित होते. कै. भास्कर मुंडे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

संग्राम मुंडे आणि अजय मुंडे यांचे ते वडील होते. कै. भाई उद्धवरावदादा पाटील यांचे अत्यंत निष्ठावान सहकारी म्हणून संपूर्ण पंचक्रोशीत त्यांची ओळख होती. त्यांनी धाराशिव शहरात गणेशोत्सवातील मेळ्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले होते. शहरात शिवजयंती सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते कठोर स्पष्टवक्ते होते. कधी काळी धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात त्यांच्या नावाला वलय होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 
Top