धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यावतीने गुरुवारी दि.14 ऑगस्ट रोजी अखंड भारत संकल्प दिवस निम्मित मशाल यात्रा चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेद्वारे भारताच्या अखंडतेचा, एकात्मतेचा आणि सांस्कृतिक ऐक्याचा संकल्प दृढ करण्याचा संदेश दिला जाणार आहे. गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता नगरपलिका मैदान, जिल्हा न्यायालयासमोर येथून यात्रेची सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे समारोप होणार आहे. मशाल हातात घेऊन घोषणाबाजी, देशभक्तीपर गाणी आणि तिरंगी ध्वजांच्या जल्लोषात ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. 1947 च्या फाळणीनंतर भारताच्या अखंडतेसाठी दिलेल्या बलिदानाची आठवण कायम ठेवत विविध घोषवाक्याखाली ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन अखंड भारताच्या संकल्पात आपला हातभार लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून याबाबतची माहिती विद्यार्थी परिषदेच्या आयोजकांनी दिली आहे.