नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून गल्लोगल्ली, रस्त्या रस्त्यावर झुंडीच्या झुंडी कुत्रे वावरत असताना लहान मुलांची मात्र गोची होत आहे, त्यामुळे कुत्रे उदंड झाली हीच उपमा सध्या कुत्र्यांच्या बाबतीत शहरात लागू होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबतीत ठोस पावले उचलून मोकाट सुटलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांत होत आहे.

नळदुर्ग शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे, हे कुत्रे गल्लोगल्ली, रस्त्या रस्त्याने झुंडीच्या रूपाने फिरत आहेत. त्यामुळे रस्त्यावर कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने लहान मुलांना, ज्येष्ठ मंडळींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गल्लीबोळात हे कुत्रे झुंडीने फिरत असल्यामुळे एखादा लहान मुलगा घराच्या बाहेर आल्यानंतर त्या मुलावरती तुटून पडण्यासारखे कुत्रे पाठीमागे लागत आहेत. त्यामुळे या कुत्र्यां पासून लहान मुलांना जेष्ठ मंडळींना कधी धोका होईल हे सांगता येत नाही. वीस ते पंचवीस कुत्रे एकत्र गल्लीबोळातून फिरत असल्याने मोठ्या प्रमाणात या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबतीत तात्काळ निर्णय घेऊन शहरात वाढलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ही कुत्र्याची टोळधाड कधी कोणाला काय करेल याचा नेम नाही, रात्रीच्या वेळी स्लॅब वर, पत्र्यावर हे कुत्रे मोठ्या प्रमाणात वावरत आहेत त्यामुळे नागरिकांच्या झोपेची मोड होत आहे. म्हणून पालिका प्रशासनाने तात्काळ शहरात वाढत असलेल्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी योग्य ती उपाय योजना आखून लवकरात लवकर कुत्र्यांचा होत असलेला सुळसुळाट थांबवावा. अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 
Top