वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी येथे सटवाईवाडी येथील सुपुत्र पुष्पराज नानासाहेब खोत यांचा आयएएस पदावर (रँक 304) झालेल्या यशस्वी निवडीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अत्यंत कठीण स्पर्धा परीक्षेतून हे यश मिळवणाऱ्या खोत यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरला.
सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. शामसुंदर डोके, प्रा. डॉ. बालाजी देवकते, प्रा. डॉ. आनंद करडे, प्रा. डॉ. महेश गुरमे, प्रा. एम. डी. उंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुंदर संचालन प्रा. महादेव उंद्रे यांनी केले तर आभार प्रा. शामसुंदर डोके यांनी मानले.
प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सटवाईवाडी सारख्या ग्रामीण भागातून तेरखेडा येथे शालेय शिक्षण, नंतर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे उच्च माध्यमिक शिक्षण, आणि नंतर शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे येथून बी. एस्सी. कृषी ही पदवी घेत पुष्पराज खोत यांनी आपली शैक्षणिक वाटचाल केली.
या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेले पुष्पराज खोत यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “हा सन्मान अत्यंत नम्रतेने स्वीकारतो. भविष्यात महाविद्यालयात येऊन स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यास सदैव तत्पर राहीन असे मत व्यक्त केले.