वाशी (प्रतिनिधी)- जिल्हा क्रिडा असोसिएशन धाराशिव यांनी आयोजित केलेल्या विभागीय स्तरावरील वैयक्तिक स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले असून त्यांची पुणे बालेवाडी येथे राज्यपातळीवर निवड झालेली आहे.
यानिमित्त महाविद्यालयामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, प्रा. डॉ अरुण गंभीरे, प्रा.शामसुंदर डोके, क्रीडा विभागप्रमुख प्रा.डॉ रवी चव्हाण व प्रा.शशिकांत सरवदे उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी रेणुका, देसाई सिद्धी, शिंदे अंकिता, माली श्वेता, फार्णे शिवानी, सावंत अशोक, उगलमुगले सुरज आणि मुजावर कैफ या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य व उपस्थितांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आणि राज्यपातळीवर स्पर्धेसाठी मान्यवरानी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.एम.डी उंदरे यांनी केले. तर आभार प्रा.डॉ रवी चव्हाण यांनी मानले.
