नळदुर्ग (प्रतिनिधी)- गेल्या पंधरवड्यात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाल्यामुळे सध्या शासनाच्या वतीने सुरू असलेल्या शेतशिवारातील पंचनाम्यात जिओ टॅगचा फोटो बंधनकारक असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. अशा अटीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
गेल्या पंधरवड्यात सतत तुळजापूर तालुक्यात सतत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप पिकाची वाढ खुंटली आहे. शिवाय खरिपाच्या सोयाबीन मूग उडीद आदी पिकाला फळ कमी प्रमाणात लागले आहे. दरम्यान अशाही परिस्थितीत पुन्हा पावसाने सतत तालुक्यात झोडपून काढल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून शेतीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान झालेल्या पिकाची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. या मागणीचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाच्या पंचनामाचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे शेतावरती जाऊन पंचनामे करण्यासाठी सुरुवात झाली आहे. मात्र सध्या या पंचनाम्यामध्ये जिओ टॅगचा फोटो बंधनकारक असल्याने जिओ टॅग मध्ये मोठ्या प्रमाणात पंचनामा करण्यासाठी वेळ वाया जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारण सर्वर डाऊन असल्यामुळे जिओ टॅग फोटो ज्या ठिकाणी पंचनामा सुरू आहे. या ठिकाणी मोबाईल मध्ये याचे सर्वर डाऊन होत असल्याने मोबाईल मध्ये लवकर जिओ टॅग कनेक्ट होत नाही. परिणामी याचा मोठा त्रास शेतकऱ्यांनाही होत आहे. कारण सर्वर डाऊन असल्यामुळे आणि संबंधित वेबसाईट व्यवस्थित सुरू होत नसल्याने पंचनामा करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा येत आहे. त्यामुळे शासनाने जिओ टॅग अट शिथिल करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.