भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील आनंदवाडी दि.10 ऑगस्ट रोजी येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम शिवसेना उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांच्या हस्ते आणि गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यामुळे गावातील सार्वजनिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
अनेक वर्षांपासून गावातील सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभामंडपाची गरज होती. ही बाब लक्षात घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या खासदार निधीतून आनंदवाडी येथे सभामंडप बांधकामासाठी निधी मंजूर केला. त्यामुळे ग्रामस्थांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे.
या भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे यांच्यासह पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य बाबू खामकर, मच्छिंद्र वनवे सर, तात्या वनवे, बापू वनवे, बाबू बांगर, सिद्धेश्वर वनवे, संदीप वनवे, प्रकाश महाराज, सागर वनवे, महादेव घोळवे, दशरथ वनवे, मच्छिंद्र वनवे, सर्जेराव वनवे, संभाजी वनवे, गोवर्धन वनवे, रवींद्र वनवे, सचिन खामकर, बालाजी वनवे, अभिमान वनवे, लक्ष्मण खामकर, सतीश मिसाळ, गणेश वनवे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित मान्यवरांनी या विकासकामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि लवकरच हे काम पूर्ण होऊन त्याचा उपयोग गावातील प्रत्येक नागरिकाला होईल, अशी आशा व्यक्त केली.