धाराशिव (प्रतिनिधी)- निसर्ग योग वर्गाचे प्रमुख योग शिक्षक आणि जिल्हा परिषदेचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री मल्हारी माने यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाल्याने त्यांचा आज निसर्ग योग वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी या वर्गाचे योगशिक्षक सूर्यकांत बापू आनंदे (सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक), साधक सुभाष नाना पवार, शेटे आप्पा, ॲड. लोमटे आबा, डॉ. गोविंद कोकाटे, सतीश पाटील, ॲड. बयाजी साबणे, राजाभाऊ कळसकर, राजाभाऊ नाईकनवरे, वनवे, बाळासाहेब गुळमिरे, उदय निंबाळकर, महादेव लिंगे, हंचाटे इत्यादी योग साधक उपस्थित होते.


 
Top