तुळजापूर (प्रतिनिधी)- “आई तुळजाभवानीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेल की, राणाजगजितसिंह पाटील यांना मंत्री करा, आणि ते नक्कीच मंत्री होतील!“ असा ठाम विश्वास व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली.
तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराच्या ऐतिहासिक विकासासाठी महायुती सरकारकडून मंजूर झालेल्या निधीच्या पार्श्वभूमीवर, भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा मठाधिपती व महसुल मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मानपञ देवुन फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मठाधिपती महंत चिलोजीबुवा, महंत इच्छागिरी महाराज, महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत व्यंकट अरण्य महाराज, गुरू महंत वाकोजीबुवा माजी आ सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील, सचिन रोचकरी, विनोद गंगणे बाळासाहेब, शिंदे विजय गंगणे, आनंद कंदले सह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत होते.
यावेळी बावनकुळे म्हणाले, “श्रीतुळजाभवानी मातेने राणा पाटील यांना तिर्थक्षेत्र विकासाचे कार्य सोपवले आहे. त्यामुळेच त्यांचा जन्म झाला आणि तुळजापूरच्या परिवर्तनाचे भाग्य आपल्याला लाभले आहे. राणा पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असून, महाराष्ट्रात सर्वोत्तम काम करणाऱ्या आमदारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘डबल इंजिन' सरकारमुळे राणा पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडणार आहे,” असे स्पष्ट करत बावनकुळे यांनी त्यांचे कार्य अमर असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमास शहरवासियांची मोठी गर्दी होती.