तुळजापूर (प्रतिनिधी)-  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीजींचे विधीवत दर्शन घेतले. पूजाअर्चा व आरती करत त्यांनी कुलधर्म आणि कुलाचार पार पाडले.

या वेळी मंदिर संस्थानचे विश्वस्त व आमदार राणाजगजितसिंह पाटील हेही मंत्र्यांसमवेत उपस्थित होते व त्यांनीही देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

दर्शनानंतर महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांनी श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची माहिती घेतली.

मंदिर संस्थानच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महसूलमंत्र्यांचा श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा व कवड्याची माळ भेट देऊन सन्मान केला.या प्रसंगी तहसीलदार व व्यवस्थापक(प्रशासन) अरविंद बोळंगे,तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top