धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत विविध गृह योजनांमधून हजारो कुटुंबांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे.केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सन 2016-17 ते 2021-22 या कालावधीत एकूण 12 हजार 809 उद्दिष्टांपैकी तितक्याच घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी 11 हजार 846 (92.5 टक्के) घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.याशिवाय 2024-25 व 2025-26 करिता मिळालेल्या 69 हजार 771 उद्दिष्टांपैकी 65 हजार 936 (94.50 टक्के) घरकुले मंजूर झाली आहेत.अलीकडेच झालेल्या आवास सर्वेक्षण 2024 अंतर्गत 1 लक्ष 5 हजार 491 नवीन कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.

राज्य पुरस्कृत रमाई आवास योजनेत सन 2016-17 ते 2023-24 दरम्यान 19 हजार 414 उद्दिष्टांपैकी तितक्याच घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 14 हजार 344 घरकुले पूर्ण झाली आहेत.उर्वरित घरकुले बांधकामाच्या विविध टप्प्यांत आहेत. याशिवाय यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत 3047 उद्दिष्टांपैकी 3747 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या शबरी आवास योजनेत 549 उद्दिष्टांपैकी 549 मंजुरी देण्यात आली आहे.त्यापैकी 343 घरकुले पूर्ण झाली आहेत.तर मोदी आवास योजना 2023-24 अंतर्गत 2274 घरकुलांना मंजुरी मिळाली असून आतापर्यंत 1047 घरकुले पूर्ण झाली आहेत.

या सर्व योजनांमुळे धाराशिव जिल्ह्यात हजारो कुटुंबांचे पक्के घराचे स्वप्न साकार झाले आहे.शासन व स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण व शहरी भागातील गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे काही लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल मिळाले तर काहींचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे.

 
Top