धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातून जाणारा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी येथे टोलनाका आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे एकूण चार फिरते वायूवेग पथके कार्यरत आहे. ही वायूवेग पथकाची वाहने एका ठिकाणी न थांबता पूर्ण जिल्ह्यात वाहनांची तपासणी करतात. तामलवाडी येथे वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयातील वायूवेग पथकाची वाहने कायमस्वरूपी स्वरूपी उभी राहत नाही. त्याचप्रमाणे तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आरटीओ विभागाकडून त्रास दिला जात नाही. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली.