तेर( प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील तेर येथे तेर बिटस्तरीय स्पर्धा संपन्न झाली.                                 

स्पेलिंग बी बीटस्तरीय स्पर्धेचे आयोजन तेर येथील केंद्रीय शाळेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेर बीट मधील इयत्ता पहिली ते आठवी मधील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला. यावेळी तेर केंद्राचे  केंद्रप्रमुख  राजाभाऊ पडवळ ,काजळा  केंद्राचे केंद्रप्रमुख  सुग्रीव घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . यावेळी प्रत्येक वर्गातून प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले. विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.परीक्षक म्हणून हलसीकर रोहिनी,शांता सलगर, देवारे जया, कदम प्रगती, जाधव मनिषा , यरकळ गणपत, नारायणकर राजेंद्र, गोडगे शरद यांनी काम पाहिले.

 
Top