तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी देवी दर्शनासाठी आले असता मराठा समाज बांधवांनी त्यांना घोषणाबाजी करत घेराव घालून निवेदन दिले.
तुम्ही सरकार व समितीत असताना मराठा आरक्षण प्रश्न का सुटत नाही. असा सवाल करुन मराठ्यांना मुंबईला येऊ द्यायचे नसले तर मराठ्यांना ओबीसी मधुन आरक्षण द्या असे म्हणाले. यावेळी बोलताना महसुल मंत्री बावनकुळे म्हणाले कि, मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकावे यासाठी प्रयत्न करीत आहोत असे उत्तर दिले. या आंदोलनावेळी महेश गवळी, अर्जुन साळुंके, अजय साळुंके, कुमार टोले यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.