तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर पावनारा गणपती ते जवाहर गल्ली हा भाग मास्टर प्लॅन अंतर्गत होणार आहे. तरीही इथे आधीच गटारीचे अनधिकृत काम सुरू आहे. ते अनधिकृत नालीकाम तात्काळ बंद करावे.मास्टर प्लॅन आणि नालीकामावर स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांनी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देवुन केली.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 04 साळुंके गल्ली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून पावनारा चौकीकडे गटारीचे काम सुरू, पण मास्टर प्लॅनची अंमलबजावणी अजून झालीच नाही. या भागात मास्टर प्लॅन होणार असल्याने सध्या सुरू असलेले नालीकाम थांबवावे.जर मास्टर प्लॅन होणार नसेल तर नगरपरिषदेकडून स्पष्ट कळवावे.अनधिकृत नालीकाम तात्काळ बंद करावे. मास्टर प्लॅन आणि नालीकामावर स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.