तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील  भातंब्रा पंचक्रोशीतील डोंगर परिसरात पुन्हा एकदा जेसीबीने डोंगर पोखरुन मुरुम या गौण खनिजाची अवैध चोरी सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खनिज चोरीकडे महसूल प्रशासन डोळेझाक करतेय की माफियांना मोकळे रान दिले आहे. असा प्रश्न स्थानिकांतून उपस्थित होत आहे. या अवैध खनिज उपशामुळे डोंगरांचे अस्तित्व धोक्यात येत असून नैसर्गिक संपदा नष्ट होतेय. यामुळे तुळजापूर- अक्कलकोट मुख्य रस्ता डोंगरालगत असल्याने रस्त्याच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. शासकीय महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, तो पैसा नेमका कुणाच्या खिशात जातोय, याची चौकशीची मागणी होत आहे.

रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरुन मुरुम चोरीला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्पांसाठीही मोठ्या प्रमाणात अवैध खनिज उपसा होत असल्याची चर्चा आहे.या सर्व प्रकरणी खनिज माफियांवर व त्यांना पाठबळ देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होते आहे.

 
Top