तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काक्रंबा  येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनेच्या कामात अनियमितता असल्यानेयाची विभागीय कार्यालया मार्फत चौकशी करण्याची मागणी काक्रंबा ग्रामपंचायतने केली आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार टाकी व पाईपलाइनचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नाही.रायझिंग मेन व गावांतर्गत पाईपलाइन निकृष्ट दर्जाची व कमी प्रमाणात टाकली जात आहे.अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष तपासणी केली नाही.ठेकेदार मनमानी मोजमाप पुस्तिकेत लिहून बीले उचलत आहेत., अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून शासनाचा निधी वाया घालवत आहेत. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून मागणी केली आहे कीतरी चौकशी होईपर्यंत आर्थिक व्यवहार थांबवावेत.उचललेल्या बिलांच्या प्रमाणात प्रत्यक्ष काम दाखवावे.  मागण्या न मानल्यास गावकरी एकत्र येऊन उपोषण करणार असल्याचा इषारा कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून मागणी केली आहे.

 
Top