तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील झुंजार हनुमान मंदिर, भवानी रोड, दिपक चौक, येथील सत्तर वर्षाची परंपरा असणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमीत्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, शिवसेना संघटक अर्जून सांळुके यांच्या हस्ते श्रीकृष्ण मुर्ती, श्रीसंत ज्ञानेश्वरी ग्रंथ, श्री तुकाराम गाथा पुजन करुन मोठ्या उत्साहात आरंभ झाला.
रविवारी प्रथम दिनी प्रवचन: ह.भ.प.श्री. शुभम महाराज दिवटे, रविवार दि. 10/08/2025 ह.भ.प. श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर किर्तन कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार दि. 16रोजी ह.भ.प. प्रशांत महाराज नांदे काल्याचे किर्तन होवुन, महाप्रसाद दिनेश खुशिराम अग्रवाल (मोनु शेठ) यांच्या वतीने होवुन या सोहळ्याचा सांगता होणार आहे.