तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील जिजामाता नगरमध्ये आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमाला सर्व जाती-धर्मातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिजामाता नगरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात युवा नेते लखन पेंढे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
हिंदू महिलांसोबतच मुस्लिम महिलांनीही लखन पेंढे यांना राखी बांधून स्नेहबंध दृढ केला. भावाच्या नात्याने राखी बांधून घेतल्यानंतर पेंढे यांनी लाडक्या बहिणींना भेटवस्तू देऊन आनंद साजरा केला. हा कार्यक्रम ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा यांचे प्रतीक ठरला.