भूम (प्रतिनिधी)- भूम तालुका बाजार समितीच्या सभापतीपदी प्रवीण देशमुख यांची तर उपसभापतीपदी आप्पासाहेब हाके यांची दि. 5 ऑगस्ट रोजी बिनविरोध निवड झाली आहे.
भूम बाजार समितीच्या माजी सभापती निलेश शेळवणे व जयसिंग गोफणे यांनी अडीच वर्षानंतर राजीनामा दिल्याने रक्त झालेल्या पदावर सभापतीपदी देशमुख उपसभापतीपदी हाके यांची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्राधिक्रम अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बी. एच. सावतर, बाजार समिती सचिव ए पी सय्यद उपस्थित होते. यावेळी निवड झाल्यानंतर फटाके फोडून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी सभापती व उपसभापती यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाप्रमुख गौतम लटके, समाधान सातव, विशाल ढगे, निलेश चव्हाण, विशाल अंधारे, रोहन जाधव, निलेश शेळवणे, जयसिंग गोफणे, रामकिसन गव्हाणे, संदीप खराडे, बालाजी गुंजाळ, युवराज तांबे, काकासाहेब मुंढेकर, रामभाऊ बागडे, बालाजी अंधारे, दत्ता गायकवाड, दत्ता नलवडे, मालन अनभूले, दमयंती जालन,अजीत पवार, वसंत कांबळे, बापू भालेराव, वसंत लवटे, दिगंबर सुपनर आदी उपस्थित होते.