तुळजापूर (प्रतिनिधी)- हरियाना राज्यातील पानीपत येथे युध्दात वीर मरण आलेल्या शुरवीरांना पानीपत येथील शहीद स्मारक स्थळी जावुन पितृपक्ष पंधरवाड्यात पितृविधी करुन त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना करण्याचा उपक्रम शहरवासियांच्यावतीने विजय गंगणे मिञ मंडळ वतीने करण्यात येणार असल्याचे माहीती कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती विजय गंगणे यांनी पञकार परिषद घेऊन दिली.
या उपक्रम बाबतीत बोलताना विजय गंगणे पांढरे म्हणाले कि पानीपत युध्दात आपले लाखो मराठ्यांना शुरमरण पत्करावे लागले आपण आपल्यातील पुर्वज मयत पावला कि त्याचा आत्मास शांती मिळावी म्हणून पितृपक्ष पंधरवाड्यात पित्तर विधी करतो. माञ या लाखो शुरमरण पत्करलेल्या मराठ्यांचा आत्मास शांती मिळावी यासाठी हा विधी केल्याचे ऐकवत नाही. म्हणून पितृपक्ष पंधरवाड्यातील आत्मास शांती लाभण्याचा विधी आम्ही करणार आहोत. यात आम्ही तुळजापूरकर सहकुटुंब थेट पानीपत येथे शहीद स्मारक स्थळी जावुन पितृपक्ष पंधरवाड्यात आपण जो विधी आपल्या पुर्वजांसाठी करतो तो विधी आपल्याच घरातील पुर्वज समजून करणार आहोत. नंतर त्यांच्या आत्मास शांती मिळावी अशी प्रार्थना करणार असल्याचे सांगितले. यावेळी जयकुमार पांढरे उपस्थितीत होते.