तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिरुपती, शिर्डी प्रमाणे तुळजापूर तिर्थक्षेत्राचा कायापालट होणार आहे. नियोजनबद्ध विकास करून तुळजापूराचे रुपांतर जागतिक दर्जाच्या तिर्थक्षेत्रात करण्याची ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

रेल्वे नंतर पशुसंग्रहालय प्राणीसंग्रहालय, बावीस एकरात उद्यान, वस्तु संग्रहालय, 108 फुटी शिल्प स्किल युनिव्हर्सिटी आदी विकास कामे प्रस्तावित आहेत. नागरिकांच्या मतांचा व तज्ञांच्या मार्गदर्शनाचा आधार घेऊन विकासाचे ब्लूप्रिंट तयार होईल. असे आमदार पाटील म्हणाले. या कामासाठी महायुती सरकारचा 1900 कोटी भरघोस निधी दिला आहे. पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, नारायण नन्नवरे, संदीप गंगणे, शांताराम पेंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


 
Top