धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा धाराशिवची बैठक दि. 24/08/2025 रोजी छत्रपती शिवाजी हायस्कूल, धाराशिव येथे संपन्न झाली. या बैठकीत अनिसाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस उत्रेश्वर बिराजदार यांचे सुरुवातीस गुलाबाची फुले देवून स्वागत करण्यात आले. त्यांनी स्फुर्ती गित गाऊन बैठकीस सुरुवात केली. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यान, निर्भयता, निती ही अनिसची विचारधारा आहे. अनिस व्यक्तीच्या शोषणाच्या विरोधात कार्य करते. वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार, प्रसार करते. ज्या वाईट रुढी, परंपरा आहेत त्याची चिकित्सा करते. व संत व समाजसुधारकांचा व संविधानाचा वैचारिक वारसा घेऊन प्रबोधनाचे कार्य करते. आता अनिसची भूमिका जनतेला पटू लागली आहे. स्वत: होवून अनिसच्या उपक्रमात लोक सहभागी होवू लागले आहेत. यावेळी अनिसचे अब्दूल लतीफ, गणेश वाघमारे, विजय गायकवाड, सिध्देश्वर बेलूरे, वामन पंडागळे, ॲड. अजय वाघाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्देश्वर बेलुरे यांनी केले आभार विजय गायकवाड यांनी केले.


 
Top