धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव उपविभागीय कार्यालयाचे पथक गस्त घालत असताना त्यांना जुगार अड्ड्या संदर्भात माहिती मिळाली. त्यामुळे हे पथक गावसुद रोडलगत चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारण्यासाठी गेले असता 8 आरोपीसह 3 लाख 42 हजार 460 रूपये किंमतीचा मुद्देमाला हाती लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, धाराशिव यांचे पथक धाराशिव उप विभागातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात गस्तीस होते. पथकास गोपनीय माहिती मिळाली की, मोईन शेख रा. खाजा नगर धाराशिव यांचे भावाचे गावसुद गावाचे रोडलगत असलेल्या शेतातील बंदीस्त रुममध्ये काही इसम तिरट जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणच्या शेडमध्ये छापा टाकला. तेथे शहेद सल्लाउद्दीन शेख, वय 40 वर्षे, देविदास केरबा सोनवणे, वय 53 वर्षे, जुबेर जमील शेख, वय 40 वर्षे, तिघे रा. खाजा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव, बाळासाहेब गणेश काकडे, वय 65 वर्षे, रा.निंबाळकर गल्ली धाराशिव, रफिक लाला शेख, वय 42 वर्षे, शेखर संदीपान शिंदे, वय 31 वर्षे, रा. देशपांडे स्टॅण्ड धाराशिव, सिध्दांत अरुण बनसोडे, वय 34 वर्षे, रा. भिमनगर धाराशिव सचिन सुनिल मोटे, वय 30 वर्षे, रा. भिमनगर धाराशिव हे सर्व लोक तिरट जुगार खेळत असताना पथकास मिळुन आले. नमूद जुगार अड्ड्यावरुन जुगार साहित्यासह रोख रक्कम असा एकुण 3 लाख 42 हजार 460 रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 4,5 अंतर्गत धाराशिव ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव यांचे आदेशावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालयाचे पथक पोलीस हावलदार हुसेन सय्यद, नागेश गरड, विठ्ठल गरड, लहु पाटील, अनिल मोरे यांचे पथकाने केली आहे.