उमरगा (प्रतिनिधी)-  मेंबरशिप ओरिएंटेशन सेमिनार रोटरी क्लब सोलापूर यांनी “रोटरी-एक प्रेरणा“ सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व रोटरी बांधवांसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रांतपाल रो. सुधीर लातूरे, पीडीजी डॉ. दीपकजी पोफळे, डीजीई  जयेश पटेल, डीजीएन क्षितिजी झावरे, रो. नितीन कुदळे आदी मान्यवरांनी रोटरी संबंधी सविस्तर असे मार्गदर्शन केले. 

रोटरीचा खरा अर्थ, समाजसेवेची संधी, मैत्री आणि नेटवर्किंगचे महत्व, रोटरीयन यांचा अधिकार व जबाबदारी, रोटरीची वैश्विक रूपाची ओळख इत्यादी संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम इंडियन रेड क्रॉस सोसायटी हॉल दमानी ब्लड सेंटर सोलापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी दोन्ही जिल्ह्यातील नवीन रोटियन सदस्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी केले. या कार्यक्रमाला उमरगा रोटरी क्लबचे सचिव प्रा. राजू जोशी, प्रशांत कुलकर्णी, परमेश्वर सुतार, शिवशंकर व्हंडरे, प्रा. सोमशंकर महाजन, देवाप्पा सूर्यवंशी, प्रा. परळकर जी.एन. उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रोटरीच्या या नव्या पर्वाची सुरुवात प्रेरणेतून करा असा संदेश दिला. कार्यक्रम अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता फोफलिया सचिव रोटरी क्लब ऑफ सोलापूर, यांनी आभार प्रदर्शन करून केली. 


 
Top