उमरगा (प्रतिनिधी)- रोटरी क्लब उमरगाच्या वतीने रक्षाबंधनच्या निमित्त उमरगा शहरातील आदर्श विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, कैलासवासी शरणप्पा मलंग विद्यालय, रामानुजन ई लर्निंग स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विकास व्हावा,नवीन कौशल्य विकसित व्हावे. यासाठी राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

मुलांनी बनवलेल्या राख्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात ज्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट राखी बनवली आहे. त्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आला.  या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब उमरगा वतीने च्या स्वतंत्र  कार्यक्रम घेऊन ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी आदर्श विद्यालय येथे 350 मुले व मुलींनी सहभाग नोंदवला. रामानुजन ई लर्निग स्कूल उमरगा येथे 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मलंग विद्यालय उमरगा या शाळेत 330 मुले सहभागी झाले तसेच जि. प. हायस्कूल उमरगा या शाळेत 375 मुलांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सहकार्य करून राखी प्रशिक्षण व प्रदर्शन यशस्वी केले.


 
Top