भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे धाराशिव जिल्ह्यात आगमन झाले. भूम-पारगाव टोलनाक्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल काळे, नेताजी पाटील, सतीश दंडनाईक यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रिमहोदयांच्या स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि भाजपला अधिक मजबूत करण्यासाठी मंत्र्यांच्या या दौऱ्याकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.