कळंब (प्रतिनिधी)- करंजकल्ला वळणावरील धोकादायक परिस्थितीबाबत नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने नमते घेत उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. एका महिन्याच्या आत येथे सुरक्षा संदर्भातील सर्व आवश्यक कामे पूर्ण केली जातील, असे पत्र आंदोलक अमर चाऊस यांना देण्यात आले. त्यामुळे प्रस्तावित रस्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

मागील काही दिवसापुर्वी शहरातील व्यापारी रमेश शिवराज होनराव यांचे करंजकल्ला येथील वळण न समजल्यामुळे अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन अंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. दिनांक 11 ऑगस्ट रोजी करंजकल्ला वळणावर रस्तारोको करण्यात येणार होता. तसेच शिवसेना (उबाठा) व तालुका व्यापारी महामंडळाने कळंब - लातुर रस्त्यावर उपाययोजना करण्याची निवेदण दिले होते. याची लातुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल घेतली आहे. हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत लातूरकळंब रामा-236 रस्ता सुधारणा प्रकल्पातील 84.20 टक्के काम पूर्ण झाले 

संबंधित कंत्राटदाराला उर्वरित काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या सर्व पुलांवर रस्ता सुरक्षा मार्गदर्शक फलक, पाईप डेलीनेटर, रिफ्लेक्टर आदी साधनांची बसवणी झाली आहे. करंजकल्ला व इतर धोकादायक वळणांवरही सूचना फलक, क्रॅश बॅरिअर यांसारख्या उपाययोजना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण केल्या जाणार आहेत. पावसाळा संपल्यानंतर उर्वरित पुलांचे पुर्नबांधणी, रस्त्याचे डांबरीकरण, ड्रेनेज, रोड फर्निचर, शोल्डर फिलिंग, जंक्शन इम्प्रुव्हमेंट इत्यादी सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचेही विभागाने आश्वासन पत्र अंदोलक अमर चाऊस यांना दिले आहे. त्यामुळे 11 ऑगस्ट रोजीचा करंजकल्ला वळणावर रस्तारोकोला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

 
Top