धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील पळसप येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मनोहर जयदेव फुटाणे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी बुधवारी दि.27 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व साधेपणाचे होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. ते पत्रकार विलास फुटाणे यांचे वडील होत.