धाराशिव (प्रतिनिधी)-  दि.27.08.2025 रोजी ते दि. 06.09.2025 या काळात साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात हजारोंच्या संखेने सार्वजनिक गणेश मंडळे मुर्ती स्थापना करुन सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यातुन त्यांच्या नेतृत्व गुणांना वावही मिळतो. परंतु यावेळी काही प्रसंगी अति उत्साहाच्या भरात काही समाज विघातक आक्षेपार्ह देखावे बांधतात. त्यातून सामाजिक ऐक्य व शांतता यास बाधा होण्याची शक्यता असते. तरी सर्व सार्वजनिक मंडळांनी आक्षेपार्ह देखावे उभारु नये असे आवाहन धाराशिव पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी केले आहे. 

पुढे बोलताना आमना यांनी सार्वजनिक मंडळांनी आपली नोंदणी नजीकच्या पोलीस ठाण्यात करुन आवश्यक असल्यास ध्वनी परवानेही घ्यावेत. मिरवणुक प्रसंगी वहातुकीच्या नियमांचे पालन करावे. ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनीयम तसेच ध्वनी प्रदुषण नियम याचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अगर हमरस्त्यावर मंडप उभारुन आमजनतेची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच देखावा पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षीततेसाठी स्वतंत्र रांगा लाउन स्वयंसेवकांची नेमणुक करावी. 


असा आहे बंदोबस्त

धाराशिव जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यलयाकडून पोलीस उप अधिक्षक 4 पोलीस निरीक्षक 19 सहाय्यक पोलीस निरीक्षक 40, पोलीस उप निरीक्षक 50, पोलीस अमंलदार 1600 एसआरपीएफ 01 प्लॉटून, 770 होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमण्यात आला आहे. गणेशोत्सव दरम्यान सर्व नागरीकांनी सतर्क रहावे, कोणी धार्मीक भावना दुखावनार नाहित किंवा सुरक्षीततेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा अफवा पसरवु नयेत. असे आवाहन पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी जनतेस केले आहे.

 
Top