धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलिस स्टेशन शिराढोण व पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व के.एन.विद्यालय शिराढोण यांचे संयुक्त विद्यमाने ध्वनी प्रदुषण जन जागृती रॅली आयोजित करण्यात आली. सदर रॅली मध्ये विद्यार्थी यांनी आम्हाला डीजे नको, ध्वनी प्रदुषण,हृदयाचा खुन, सजान शिराढोंणकर, आमचे आरोग्य हीरावु नका, ध्वनी प्रदुषण कमी करूया, आपण सर्व एकत्र येवूया, बास कमी, सास जास्त, तुमचा, सामन्याची डोकेदुखी, कान फटण्या आधी आवाज थांबवा., सण आहे युद्ध नाही,आवाज कमी ठेवा वगेरे अशा जनजागृती पण घोषणा देवून शिरढोण वासियांना ध्वनी प्रदुषण न करण्याचे आवाहन केले.येणारे सणामध्ये डीजे न लावता सण साजरे करण्याचा संदेश दिला. 

यामध्ये दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, पोलिस स्टेशनचे अधिकारी, पोलिस अंमलदार सहभागी होऊन रॅली पूर्ण गावातून काढण्यात आली. या रॅली बाबत जनसामान्यांमध्ये चांगली च चर्चा रंगली असून यातुन तरुणांनी व श्री गणेश मंडळांनी बोध घेवून डीजे मुक्त सण साजरे करावेत व एक आदर्श घालावा अशी ही भावना व्यक्त केली जात आहे. पोलीस विभागाकडून देखील सर्वांनी डीजे मुक्त मिरवणूक काढणे व कायद्याने मर्यादित केलेल्या आवजच्या पातळीचे पालन करावेत. कायद्याचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.


 
Top