वाशी (प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर चा 67 वा वर्धापन दिन महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले व त्यानंतर विद्यापीठगीत घेण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरची स्थापना 23 ऑगस्ट 1958 ला झाली असून महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे माजी पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात पूर्वाश्रमीचे मराठवाडा विद्यापीठ व आत्ताचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
सुरवातीच्या काळामध्ये या विद्यापीठाअंतर्गत मोजकेच महाविद्यालय होते. परंतु आज या विद्यापीठाअंतर्गत बहुसंख्य महाविद्यालयाचा कारभार चालत आहे. छत्रपती संभाजी नगर येथे नागसेन वनामध्ये असलेले मिलिंद महाविद्यालय आणि विद्यापीठ यामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी समाज आणि राष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतील असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे संचलन क्रिडा विभाग प्रमुख प्रा.डॉ रवी चव्हाण यांनी केले तर प्रा.शशिकांत सरवदे यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद,कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.