वाशी (प्रतिनिधी)-  कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे मुलींच्या वसतिगृहामध्ये महाविद्यालय विकास समितीचे माजी सदस्य स्वर्गीय अरुणोजीराव श्रीनिवासराव देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मछिंद्र तात्या कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम यांच्या अध्यक्षेते खाली वसतिगृहातील मुलींना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी लक्ष्मीकांत देशपांडे,प्रविण कवडे वसतिगृहाच्या गृहपाल प्रा.डॉ अश्विनी नवले वसतिगृह समिती सदस्य प्रा.शामसुंदर डोके, प्रा.डॉ दैवशाला रसाळ, प्रा.एम.डी  उंदरे, प्रा.छाया नखाते व अनिशा चेडे उपस्थित होते. यावेळी बोलताना मछिंद्र तात्या कवडे म्हणाले कि, महाविद्यालय स्थापनेसाठी स्वर्गीय अरुणोजीराव दादा यांनी मोलाचे काम केले आहे त्यांचे व्यक्तिमत्व हे विद्यार्थांना प्रेरणादायी राहावे म्हणून शैक्षणिक साहित्यावर त्यांची प्रतिमा लावण्यात आली असून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते असे ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक कदम म्हणाले कि, तुम्हाला मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग तुम्ही दैनंदिनी लिहण्यासाठी करावा व ही दैनंदिनी तुमच्या जीवनाला दिशा देण्याचे काम करेल असे ते म्हणाले.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.एम.डी उंदरे तर प्रा.शामसुंदर डोके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला वसतिगृहातील विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top