भूम (प्रतिनिधी)- माहे एप्रिल आणि मे 2025 मध्ये परांडा- भूम- वाशी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झालेली होती. यामध्ये परांडा तालुक्यातील 682.12 हेक्टर, भूम तालुक्यातील 544.01 हेक्टर तर वाशी तालुक्यातील 646.75 हेक्टर जमीन बाधित झालेली होती. परांडा भूम वाशी तालुक्यातील एकूण 4436 शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालेले होते.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपीकाचे नुकसान झाल्यास पूढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकिरता शेतक-यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वळेेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतीसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. यानुसार परांडा भूम वाशी तालुक्यामध्ये माहे एप्रिल 2025 आणि माहे मे 2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट मुळे झालेल्या नुकसानीचे 3 कोटी 32 लक्ष रुपये शेतकऱ्यांना मंजूर झालेले असून हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा. असे निवेदन जिल्हाधिकारी धाराशिव यांना परांडा भूम वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी दिले आहे.