तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत तालुक्यात 549.6 मिमी म्हणजे सरासरीच्या तब्बल 124.9 टक्के पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे 19854 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सोयाबीन, उडीद, मुग या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
काही गावांचा अहवाल अद्याप बाकी असल्याने बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शाषण आदेशानुसार पंचनामे सुरु आहेतअशी माहीती कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांनी दिली. 27 ऑगस्ट रोजी जळकोट व नळदुर्ग महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. तर सावरगाव व इतर मंडळात सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचनाम्यांची कामे सुरू आहेत. काही गावांचा अहवाल अद्याप बाकी असल्याने बाधित क्षेत्राचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मंडळनिहाय पावसाची नोंद
तुळजापूर 463.2, सलगरा 516.8, सावरगाव 452.9, मंगरुळ 519, इटकळ 859, जळकोट 513, नळदुर्ग 621, आजवर तालुक्यात एकूण 549.6 मिमी (124.9 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे. तुळजापूर तालुक्यातील नादुरी गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे पीक पाण्यात आहेत. माञ पर्जन्यमापक यंत्र इतर गावात असुन तिथे कमी पाऊस दाखवत आहे. खरी परिस्थिती वेगळी असूनही कागदोपत्री पावसाची नोंद कमी असल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
