धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील श्री संत वै भगवान भाऊ व परमेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवा निमीत्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ह्या प्रथमदिन पूजन सोहळ्या प्रसंगी श्री क्षेत्र रामलिंग संस्थांचे अध्यक्ष हेमंत (बापू )सस्ते . माजी तंटामुक्ती समिती आध्यक्ष संजय काका पाटील, श्री गजानन नलावडे , ह भ प गोविंद महाराज नागटिळक,सौदागर मोहिते, श्रीहारी मेटे ,आशोक देशमुख बाजीराव देशमुख ,सुनिल महाराज तवले,दत्ता महाराज तवले आदि ग्रामस्थ भाविक उपस्थितीत होते.उत्सव  दि 7  गुरुवार  ते 14 गुरुवार 2025 या कालावधीत होणार आहे .

यामध्ये श्री संत वै .भगवान भाऊ तापडिया यांच्या पुण्यस्मरणा निमित्त राष्ट्रीयअध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे सोलापूरकर यांचे दि .9 शनिवार रोजी दुपारी 10 ते 12 बारा  तर दि .13 रोजी परमेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त दुपारी 10 ते 12 या वेळेत गुलालाचे कीर्तन हरिभक्त परायण  ह भ प बाबुराव महाराज माळकरंजकर यांचे होणार आहे.तर उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा एकनाथ महाराज मलकापूरकर व काल्याचे किर्तन ह .भ.प बंकट महाराज बेदरे यांचे होणार आहे.या दरम्यान ह.भ.प गोविंद महाराज नागटिळक श्री ह .भ.प नंदकुमार खोत श्री ह.भ.प दिगांबर महाराज खोत ह भ.प आंकुश महाराज वाघमोडे ह .भ.प उद्धव महाराज दन्ने यांचे किर्तन सेवा होणार आहेत. तर प्रवचन सेवा ह भ प बाबुराव महाराज पुजारी ह भ प ऋषिकेश महाराज चव्हाण , ह भ प प्राध्यापक ए आर भोरे ह भ प राहुल महाराज कुलकर्णी, ह .भ प राम महाराज मोरे ह भ प आंकुश रामहरी पाटील, ह |भ .प जगन्नाथ महाराज गव्हाणे ,यांची प्रवचन सेवा होणार आहेत .दरम्यान तापडिया परिवारातील श्री नंदु भऊ तापडिया ,श्री रविंद्र तापडिया ,श्री सुरेश भाई तापडिया व समस्त तापडिया परिवार यांची उपस्थिती लाभणार आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अहवान संयोजक श्री परमेश्वर आण्णा पवार, श्री तानाजी जाधव श्री,संतोष  बप्पा पवार तसेच येडशीकर ग्रामस्थ व मंदिर धर्मकार्य प्रमुख श्री महादेव जालिंदर सस्ते गुरुजी यांनी केले आहे.

 
Top