परंडा (प्रतिनिधी)- बावची विद्यालयात जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने किशोरवयीन जीवन कौशल्य कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.21 रोजी करण्यात आले होते.

या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय परंडा चे डॉ.आनंद मोरे वैद्यकीय अधिकारी, अमोल वाबूरकर सकमुपदेशक,  अजय वैद्य प्रयोग शाळा सहाय्यक हे उपस्थित होते. या प्रसंगी विद्यालयच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आले. यावेळी डॉ. आनंद मोरे यांनी विद्यार्थ्यांना किशोर वयात शारीरिक मानसिक व सामाजिक बदल, लैंगिक जिज्ञासा, एच आय व्ही चा धोका व प्रतिबंधक उपाय,गैरसमज आणि प्रतिबंध उपाय योजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top