तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री संत सेना महाराज पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी संत सेना महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना महंत मावजीनाथ महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आली. तर बुधवारी ह.भ.प.अश्विनीताई राऊत महाराज यांचे सुश्राव्य गुलाल किर्तन सेवा संपन्न झाली.नंतर नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यासह आठावडा बाजार येथे नाभिक व्यवसाय करणाऱ्या ग्रामीण समाज बांधवाना सलून किटचे युवा नेते विनोद गंगणे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी आनंद कंदले सह अन्य मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.