तुळजापूर (प्रतिनिधी)- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गावोगाव चावडी बैठकींना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

दहा उंबरठ्याच्या छोट्या गावापासून ते पाचशे उंबरठा असलेल्या मोठ्या खेड्यांपर्यंत मराठा समाज एकवटल्याचे चित्र दिसत आहे. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या चळवळीला नवी उर्जा देतो आहे. बैठकीदरम्यान “आता कुठे जायचं? मुंबईलाच जायचं!” अशा घोषणा गावोगावी दणाणून निघत आहेत. यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसुन येत असुन संध्याकाळी व पारावर पार पडणाऱ्या बैठकीत मोर्चाबाबत सविस्तर माहिती देवुन सहभागींची नोंदणी करून नियोजनबद्ध तयारी केली जात आहे. सर्वच पक्षातील मराठा नेते, अगदी भाजपचे नेतेही बैठकींना उपस्थित राहत आहेत.  अनेक  जाती-धर्म संघटनांचा उघड पाठींबा; मुस्लीम बांधवांचा सहभाग लक्षणीय दिसत आहे. मराठा सेवक तेजस बोबडे, महेश गवळी, अजय सांळुके, कुमार टोले, सत्यजित साठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते गावोगाव जाऊन जनजागृती करत आहेत. नेता नसतानाही सेवकांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठका मोर्चासाठी मराठा समाजाला एकजूट करत असल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यातील तब्बल 90 टक्के गावांमध्ये चावडी बैठका पार पडल्या असून, मोर्चासाठी संपूर्ण मराठा समाज सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.

 
Top