उमरगा (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य रोल बॉल संघटना यांच्या अंतर्गत धाराशिव जिल्हा रोल बॉल संघटना व ओम साई स्पोर्ट्स क्लब उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 वी मिनी राज्यस्तरीय मीनी रोलबॉल स्पर्धा ओम लॉन्स लातूर गुलबर्गा रोड चौरस्ता उमरगा जि. धाराशिव येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत मुलांचे 22 तर मुलींचे 11 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, डॉ. विजय बेडदुर्गे, इधर व्हील क्लबचे अध्यक्ष ॲड. पियुषा माणीकवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व पंच, खेळाडू, मार्गदर्शक, व्यवस्थापक, निवड समिती सदस्य, पालक व स्पर्धा प्रमुख जयप्रकाश सिंग आयोजन समिती ओम साई स्पोर्ट्स क्लब उमरगा अमीर शेख, अमोल बडवे, सनी सगर, ॲड. श्रीपाल पाटील, योगेश सौदागर, मलदोडे, अविनाश जोशी, ओम राठोड, साई राठोड, गजानन पवार, सत्य गणेश गाली पिल्ली, अमोल पवार, लक्ष्मण एकुर्गी, आदित्य पवार, धाराशिव रोलबॉल संघटनेचे सचिव प्रताप राठोड व त्यांचे सर्वं पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य व परिश्रम करून स्पर्धा यशस्वी पार पाडली.
बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित
कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख अस्लम गुलाबसाब, महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे सचिव प्रताप पगार, प्रमुख पाहुणे विकास स्वामी, डॉ विजय बेडदुर्गे, डॉ सुहासिनी शेंडगे, धाराशिव रोल बोल संघटनेचे सचिव प्रताप राठोड, अमीर शेख, योगेश सौदागर, ॲड यशपाल पाटील, जगन्नाथ चव्हाण, शिरशीकर, दादासाहेब भोरे उमरगा तालुका क्रीडा समिती तालुका क्रीडा संयोजक राजेंद्र सोलंकर, क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर, प्रशांत राठोड उपस्थित होते.
अंतिम निकाल मुलांच्या गटातून प्रथम पुणे, व्दितीय मुंबई शहर, विभागून तृतीय अकोला, तृतीय बीड तर मुलींच्या संघातून प्रथम सातारा, व्दितीय मुंबई शहर, तृतीय अकोला, तृतीय बीड या संघांनी यश संपादन केले. धाराशिव जिल्हा रोलबॉल संघटनेने ही स्पर्धा अतिशय उत्तम रित्या पार पडली आहे.