तुळजापूर (प्रतिनिधी)- राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी श्री तुळजाभवानी देवींचे विधीवत दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.