कळंब (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या उपक्रमशील आदर्श शिक्षकांची कळंब तालुक्यातील 10 शिक्षकांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या “शिक्षक प्रेरणा“ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रत्येक वर्षी गुणवत्ता वाढीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना “शिक्षक प्रेरणा“ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. सन 2024 - 2025 या शैक्षणिक वर्षातील शिक्षक प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हे पुरस्कार तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून 1 याप्रमाणे 10 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार प्रत्येक केंद्रातून प्राथमिक स्वरूपात दिला जाणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेले शिक्षक
सुधाकर मधुकर सुरवसे (प्रशाला खामसवाडी), मनीषा सुधाकर देशमाने (पाडोळी), पद्मा दत्तोपंत बुर्से (लोहटापूर्व), रमेशकुमार दादासाहेब काकडे (प्रशाला शिरढोण), रोहिणी रामचंद्र जमाले (गोविंदपुर), मनीषा भारत वाघमारे (येरमाळा), महादेव बळीराम मोहिते (सातेफळ), राजकन्या श्रीकिशन तोडकर (आंदोरा), सारिका रखमाजी शेळके (खोंदला), महादेवी नागनाथ झाडे (नप शाळा क्रमांक 1 कळंब).
हा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी पाच वाजता शिक्षक भवन कळंब या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्यचिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बारकुल, मार्गदर्शक दत्तात्रय पवार, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप म्हेत्रे, तालुका नेते गणेश कोठावळे, तालुकाध्यक्ष प्रशांत घुटे, कार्याध्यक्ष महादेव मेनकुदळे, चिटणीस संतोष लिमकर, कोषाध्यक्ष प्रशांत निन्हाळ यांनी सर्व निवड झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
तरी या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन तालुका शाखेच्या वतीने दीपक चाळक, अशोक डिकले, सुनील बोरकर, सचिन तामाने, अविनाश खरडकर, भूषण नानजकर, दत्तात्रय सुरेवाड, रवींद्र शिनगारे, श्रीमती वैशाली क्षिरसागर, श्रीम कालींदा मुंडे, श्रीम ज्योती ढेपे, रामचंद्र पवार, संतोष मोहिते, जनार्दन धुमाळे, संदीप मगर, अशोक बिक्कड, प्रदीप रोटे, यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उपक्रमशिल शिक्षकांना प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. हा पुरस्कार देत असताना कोणत्याही शिक्षकाकडून कसलीही फाईल किंवा कागदपत्रे घेतले जात नाहीत. प्रशासन, क्षेत्रीय अधिकारी व केंद्रातील शिक्षक प्रतिनिधी यांच्या समवेत चर्चा करून पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड केली आहे.
बाळकृष्ण तांबारे
राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक महासंघ