धाराशिव (प्रतिनिधी)- संत ज्ञानेश्वर नगर येथे स्थापन होत असलेल्या शिवशक्ती शिवालय या मंदिरात 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता शिवलिंग स्थापना सोहळा संपन्न होणार आहे. या पवित्र कार्यासाठी धाराशिव शहरातील नागरिक, भक्तगण आणि महिलांनी विशेष योगदान दिले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, 8 ऑगस्ट 2024 रोजी या मंदिराचे भूमिपूजन झाले होते आणि त्यानंतर मंदिर बांधकामास सुरुवात झाली. हे मंदिर हे “नारी शक्तीचे प्रतीक” ठरले आहे. महिला शक्तीच्या एकतेने आणि समर्पणातून उभे राहिलेले हे मंदिर समाजासाठी प्रेरणादायक ठरणार आहे. मंदिर बांधणीपासून ते निधी संकलनापर्यंतचे संपूर्ण कार्य परिसरातील महिलांच्या पुढाकाराने आणि समाजातून निधी संकलन करून पूर्ण झाले आहे.
या मंदिर उभारणीत सक्रिय सहभाग व श्रमदान करणाऱ्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे-
सौ. अंजली नामदेव माने देशमुख, सौ. सोनल नलिन पिंपळे, सौ. पूजा राजे, सौ. संध्या हवालदार, सौ. वैशाली भुतेकर, सौ. गडकर ताई, सौ. सुनंदा लोमटे, सौ. आशा ढोणे, सौ. गवळण काळे, सौ. वंचना माने, सौ. सुषमा माने, सौ. पल्लवी माने, सौ. संजना लोहरे, सौ. वनिता वतने, सौ. सोना कोल्हे, सौ. दीपा लाटे, सौ. शशिकला विरोदे, सौ. लता वैद्य, सौ. सरस्वती शंकर सलगर. इ.
या पवित्र कार्यासाठी निधी अर्पण करून योगदान देणाऱ्या दात्यांचे नावे पुढीलप्रमाणे-
सौ. राजश्री राजेंद्र बागल, सौ. अंजली दिनेश उर्फ दत्ता काकडे, सौ. शकुंतला श्रीराम मुंडे, सौ. अनिता विक्रमराव शिंदे, सौ. राजश्री विनोद निंबाळकर, सौ. संगीता प्रवीण काळे, सौ. अंजली नितीन काळे, सौ. सरोजिनी दिलीप जगताप, सौ. सारिका अनंत जगताप, श्रीमती.प्रेमा विजय जगताप, सौ. मंगल दीपकराव कावळे, सौ. प्रणिता सत्यजित काळे, सौ. लतिका पाटील, सौ. वैजयंती तावडे. इ.
या भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमात सर्व श्रद्धावान नागरिकांनी उपस्थित राहावे व पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन शिवशक्ती शिवालय समिती, संत ज्ञानेश्वर नगर यांनी केले आहे.
