कळंब (प्रतिनिधी)- नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळंब शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात “आम्ही वारीक, वारीक हजामत करू बारीक” या अभंगाच्या गजराने वातावरण भारावून गेले.

सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी सोहळा आणि दिंडीचे आयोजन करण्यात आले. हभप. गुरु रामचंद्र बोधले महाराज व हभप. बलभीम महाराज धाकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला-पुरुषांसह लहान वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. लहानग्यांच्या गोड भजनांनी आणि महिलांच्या फुगडीने सोहळ्याला रंगत आली.

यानंतर हभप. अण्णासाहेब बोधले महाराज यांचे गुलालाचे कीर्तन पार पडले. अभंगांच्या ओघात त्यांनी युवापिढीला संदेश दिला की, “संत सेना महाराजांसारखे आचरण करणे हीच खरी आपली गुरुदक्षिणा आहे.”दुपारी बारा वाजता संतांच्या मूर्तीवर गुलाल पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. मंदिर परिसरात डॉ. भागवत राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन झाले. राहुल देवळकर यांच्या वतीने मोफत औषधोपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. शेकडो बांधवांनी शिबिराचा लाभ घेतला.

यानंतर ज्ञानेश्वर जगन्नाथ पंडित यांच्या पुढाकाराने महाप्रसादाचे आयोजन झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विष्णू मंडाळे, बापुराव सुरवसे, सतीश गोरे, राजे सावंत, प्रमोद करवलकर, युवराज पंडित, ओंकार मंडाळे, सूरज मंडाळे, आबासाहेब मंडाळे, रणजित शेंद्रे, महेश काळे, गोकुळ मंडाळे, मुन्ना काळे, विनायक माने, अमोल सुरवसे, योगेश करवलकर, सिद्धेश्वर डिगे, श्रीकृष्ण अंबुरे, शशिकांत गायकवाड, महादेव धाकतोडे, महेश सुरवसे, हरी मंडळ, रामेश्वर पौळ, अक्षय मंडाळे, अशोक मंडाळे, लिंबराज देवकर आदींनी परिश्रम घेतले.


 
Top