तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील एकूण 25 शाळांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत संगणक, स्मार्ट टीव्ही व बेंचेसचे वाटप करण्यात आले. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद शाळा आणि 14 इतर शाळांचा समावेश होता.

दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या कार्यक्रमात बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी 300 बेंचेस (19 शाळांना), 5 स्मार्ट टीव्ही (5 शाळांना) आणि 6 संगणक (6 शाळांना) प्रदान करण्यात आले.

राम रेड्डी यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम अधिकारी, उद्योजक व आदर्श शिक्षक बनविण्यावर भर दिला. त्यांनी सीएसआर अंतर्गत वाडिया हॉस्पिटलच्या ओपीडीच्या नुतनीकरणाबाबत देखील माहिती दिली. कार्यक्रमात मुख्याध्यापक शिवाजी राठोड (मंगरुळ) यांचा सेवानिवृत्ती निमित्त व शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे (तामलवाडी) यांचा “नारीशक्ती पुरस्कार“ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे यांनी केले. यावेळी अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


साहित्याचे लाभार्थी शाळा:

स्मार्ट टीव्ही (5): तामलवाडी, पिंपळा खुर्द, फुलवाडी, मंगरूळ, तेरखेडा

संगणक (6): सिंदगाव, आळणी, डाळिंब, उमरगा, शांतीसागर, तोरंबा

बेंचेस (300): चिखली, बेंबळी, राधानगरी, परांडा, नळदुर्ग, उमरगा, तुळजापूर, बिजनवाडी, मंगरूळ, नंदगाव, जळकोट, होर्टी.


 
Top