धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत ‌‘वीर परिवार सहाय्यता योजना 2025' अन्वये धाराशिव येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जिल्हा विधी चिकित्सालय कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.या कक्षाचे उद्घाटन 7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता,जिल्हा न्यायालय परिसरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हॉलमध्ये होणार आहे.

या चिकित्सालय कक्षाच्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या पत्नी, पालक, सेवारत व माजी सैनिक तसेच त्यांच्या विधवांना न्यायालयीन प्रकरणांमध्ये निःशुल्क व तातडीने कायदेशीर मदत मिळणार आहे. 

या उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष श्री.स्वप्निल खटी यांच्या उपस्थितीत होणार आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वीर पत्नी,वीर माता-पिता,सेवारत व माजी सैनिक,तसेच विधवांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.दुरध्वनी 02472-222557 भ्रमणध्वनी: 7588527554 असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, धाराशिव यांनी कळविले आहे.


 
Top